बुलढाणा  : काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांची बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामधील भास्तान या गावी कॉर्नर सभा सुरू असताना अज्ञाताने फटाके फोडले आहेत. राहुल गांधी यांचे भाषण सुरू असतानाच फटाके फोडल्याने राहुल गांधी यांनी आपले भाषण अर्धवट सोडले. राहुल गांधी यांनी फटाके वाजवणाराचा निषेध केला आहे.  


काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. यात्रा आज बुलढाण्यात असताना राहुल गांधी यांची खामगाव तालुक्यातील भास्तान या गावी कॉर्नर सभा सुरू होती. यावेळी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना कार्यकर्त्यांनी स्टेज जवळच मोठ्या आवाजात फटाके फोडले. त्यामुळे राहुल गांधी यांनी सभेत भाषण अर्धवट सोडले. राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यास सांगितले आणि फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली. यावेळी कोणीतरी ज्याने ही हरकत केली त्याला ताब्यात घ्यावे असे माईकवरून सांगितले. 
 
यावेळी रद्द करण्यात आलेल्या कृषी कायद्यांवरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. "तीन कृषी कायदे रद्द करण्याची पंतप्रधानांची मानसिकता नव्हती. शेतकऱ्यांचा घामाचा पैसा काही उद्योगपतींच्या खिशात त्यांना द्यायचा होता. परंतु, शेतकऱ्यांच्या ताकदीने कृषी कायदे रद्द करावे लागले. 733 बळी या बदल्यात दिले आहेत. जर लवकर कायदे रद्द केले असते तर बळी वाचले असते, असे राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे.  


दरम्यान, सभेत फटाके फोडण्यावरून भाजपने राहुल गांधी यांच्यावर टीक केली आहे. "राहुल गांधी यांनी बोलावलेल्या कॉर्नर सभेत शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करताना फटाके फोडून आनंद साजरा केला आणि आपली शेतकऱ्यांप्रति असंवेदनशीलता दाखविली. शतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करताना फटाके फोडतात का...?  आपल्याच मंचावर अवैध सावकारी करणाऱ्या सावकाराला बसवून शेतकऱ्यांना राहुल गांधी यांनी अपमान केलाय, अशी टीका  खामगाव विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार आकाश फुंडकर यांनी केलीय.  


दरम्यान, जलंब येथे आज सकाळी दहा वाजता मोठ्या उत्साहात भारत जोडो यात्रेचे स्वागत झाले. येथील शाळेच्या मुलांनी शाळेच्या बाहेर मैदानात स्वागतासाठी मोठी रांग लावली होती. काही ठिकाणी इंदिरा गांधी, महात्मा गांधी, पंडित नेहरू यांची वेशभूषा केलेली मुले इतिहासाची आठवण करून देत होते. अभिरा अभय गोंड या तीन वर्षांच्या मुलगी बालशिवाजी वेशभूषा करून तलवारीसह घोड्यावर बसली होती. बाजूला सहा मावळे होते. 


महत्वाच्या बातम्या


Parbhani : शेतकऱ्यांची थट्टा! कुणाला पावणेदोन रुपये तर कुणाला 70 रुपयांची मदत; शेतकरी आक्रमक