भंडारा : भंडाऱ्यात एका नराधमनानं दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही, तर आरोपीने एकीचा विनयभंग केल्याची माहिती आहे. गेल्या वर्षभरापासून तो अत्याचार करत असल्याचा आरोप आहे.

 
बलात्कार आणि विनयभंग प्रकरणी आरोपी कमलेश वलदेला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने वर्षभरापूर्वी दोन्ही अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला होता. मात्र दोघी गप्प राहिल्यानं त्याची हिंमत वाढली आणि आरोपीने अत्याचाराची पुनरावृत्ती केली.

 
बलात्कार पीडित एका मुलीचं वय 9 वर्ष तर दुसरीचं वय 6 वर्ष असल्याची माहिती आहे. विनयभंग केल्याचा आरोप असलेली मुलगी अवघ्या 5 वर्षांची आहे. आरोपी कमलेश वलदे विरोधात जवाहरनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.