बेळगाव : बेळगावच्या (Belgaum) मुगळीहाळमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. विजेच्या खांबावर दुरुस्ती करण्यासाठी चढलेल्या लाईनमनचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तीन तासांहून अधिक काळ झालं लाईनमनचा मृतदेह विजेच्या खांबावर लटकलेला आहे. वीज पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिल्यावर देखील अधिकारी घटनास्थळी फिरकले नाहीत. 

बगरनाळ गावातील 25 वर्षीय मारुती आवळी हे वीज पुरवठा मंडळाचे लाईनमन होते. मुगळीहाळ गावात विजेच्या खांबावर चढून काम करत असताना त्यांना अचानक विजेचा धक्का बसला यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. विजेच्या खांबावर काम करत असताना ही दुर्घटना घडली आहे. मारुती आवळी यांचा मृतदेह तीन तासांपेक्षा जास्त काळ खांबावर लटकलेला होता, तरीही  वरिष्ठ अधिकारी किंवा कर्मचारी मदतीसाठी जवळ आले नाहीत.  अधिकाऱ्यांच्या या  निष्काळजीपणाविरोधात मुगळीहाळ गावातील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Beed News : बीडमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राला वीज जोडणी नसतानाही तब्बल 90 हजारांचं बिल; महावितरणच्या अजब कारभाराने आरोग्य अधिकारी चक्रावले!