बेळगाव : 'जय महाराष्ट्र' लिहिलेली पहिली बस बेळगावात आल्यावर 'जय महाराष्ट्र' म्हणून घोषणा दिल्याप्रकरणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांसह एसटीचे ड्रायव्हर,कंडक्टर यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.


मदन बामणे, अमर यळ्ळूरकर, गणेश दड्डीकर, सुरज कणबरकर यांच्यासह अन्य बारा जणांवर राजद्रोहाचा गुन्हा मार्केट पोलिसांनी दाखल केला आहे. 143, 147 आणि 153 अ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ‘जय महाराष्ट्र’ लिहिलेली महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली एसटी बेळगावात दाखल झाली. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बसचं जंगी स्वागत केलं. तसंच बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना पुष्पगुच्छ आणि भगवा फेटा घालून स्वागत केलं.

कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी कर्नाटकात ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्यास लोकप्रतिनिधींचं पद रद्द करण्याचा कायदा करण्याची धमकी दिली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्राचे परिवाहन मंत्री दिवाकर रावते यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक एसटी बसवर जय महाराष्ट्रात लिहिण्यात येईल, अशी घोषणा केली होती.

त्याप्रमाणे शुक्रवारी सकाळी मुंबईहून निघालेली मुंबई-बेळगाव बस रात्रीसाडे नऊच्या दरम्यान बेळगाव स्थानकावर पोहोचली. यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी ड्रायव्हर, कंडक्टरला फेटा बांधून प्रवाशांना पेढे वाटले आणि जय महाराष्ट्रच्या घोषणा दिल्या.

त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यासह एसटी चालक, कंडक्टर यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

'जय महाराष्ट्र' लिहिलेल्या एसटीचं बेळगावात जल्लोषात स्वागत

दिवाकर रावतेंनी ‘करुन दाखवलं’, एसटीवर ‘जय महाराष्ट्र’

आता राज्यातील प्रत्येक एसटीवर ‘जय महाराष्ट्र’ची पाटी

‘जय महाराष्ट्र’च्या फतव्याविरोधात मोर्चा, शिवसेना मंत्र्यांना कोल्हापुरातच रोखलं!

कर्नाटक मंत्र्याविरोधात बेळगावात मराठीजनांचा मोर्चा

अरेरावीची भाषा खपवून घेणार नाही, चंद्रकांत पाटलांचा रोशन बेगना सज्जड दम

शिवसेना आक्रमक, कर्नाटकच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’चे स्टिकर्स

‘जय महाराष्ट्र’ बोलल्यास पद रद्द, बेळगावात मराठी लोकप्रतिनिधींची गळचेपी