बीडमध्ये पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 05 Sep 2018 11:27 AM (IST)
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ते पोलिस नाईक पदावर कार्यरत होते. गेल्या दोन महिन्यांपासून ते आजारी रजेवर होते.
बीड : बीडमधील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (5 सप्टेंबर) रात्री दहाच्या दरम्यान उघडकीस आली. कालिदास पोकळे असं आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ते पोलिस नाईक पदावर कार्यरत होते. गेल्या दोन महिन्यांपासून ते आजारी रजेवर होते. रात्री दहाच्या सुमारास त्यांनी शिवाजीगर भागातील राहत्या घरी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे. महत्त्वाचं म्हणजे पत्नी मुलांसह माहेरी गेल्यानंतर घरात कोणीच नसताना त्यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं.