Beed: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात संपूर्ण बीड जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. एकीकडे वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर एकीकडे वाल्मिक कराडप्रकरणात  खंडणी प्रकरणाची पाळंमुळं खणून काढणाऱ्या सुरेश धसांच्या कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधलाय. परळीत आज वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलन सुरु केल्यानंतर व्यापाऱ्यांवर दबाव आहे. मंत्री धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून काल परळी बंद होती असा आरोप केलाय.


मकरसंक्रांतीला परळी बंद


आमदार सुरेश धस समर्थक यांच्या वतीने आमदार सुरेश धस, मनोज जरांगे पाटील व आमदार सोळूंखे,खा.बजरंग सोनवणे, आमदार संदिप क्षीरसागर यांच्या फोटोला दुध अभिषेक घालून आष्टी पोलिस स्टेशन ला निवेदन देण्यात आले की मुख्य आरोपींना अटक करण्यात यावी. परळी येथे चूकीच्या पध्दतीने आंदोलन सुरू केले आहे .हया आंदोलनामागे मोठी व्यक्ती, मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यांनी सांगितले म्हणूनच परळी मकरसंक्रांतीच्या दिवशी बंद होतेय.उद्या आंदोलनामागे धनंजय मुंडे यांचाच हात आहे.अशी प्रतिक्रिया आष्टीतचे नगराध्यक्ष जिया बेग यांनी दिली आहे.


सुरेश धसांचे कार्यकर्ते आक्रमक


मोक्का गुन्हा दाखल केल्यानंतर परळीत जे आंदोलन सुरु केलं आहे. चुकीच्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं आहे. तपास भरकटवण्यासाठी हे सगळं सुरु आहे. या गुन्ह्याचे खरे सुत्रधार वेगळे आहेत. या मतदारसंघाचे मालक यामागे आहेत. असे म्हणत धस यांच्या कार्यकर्ते आक्रमक झाले होते.


वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर परळीत कराड समर्थकांनी आंदोलन सुरू केलं आहे. तर, परळी बंदचीही हाक देण्यात आली आहे. त्यामुळे, एकीकडे वाल्मिक कराडवर एसआयटी व सीआयडीकडून कारवाईचा बडगा उगारला जात असताना दुसरीकडे त्याचे समर्थक आंदोलनाच्या माध्यमातून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच, आज आरोपीला केज ऐवजी बीड न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत वाल्मिक कराडवर तिसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे.