बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे वडील पंडीतअण्णा मुंडे यांचं दीर्घ निधन झालं. बीडमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 75 वर्षांचे होते.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली.
पंडीतअण्णा मुंडेंच्या राजकारणाची सुरुवात गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतच झाली. गोपीनाथ मुंडे राज्याचं राजकारण पाहात असताना, बीड जिल्ह्याची मदार पंडीतअण्णा मुंडेंवर होती.
पंडीतअण्णांनी दोन वेळा बीड जिल्हापरिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. शिवाय संत जगमित्र नागा सहकारी सूतगिरणीचे ते संचालक होते. तसंच परळी बाजारसमितीचेही पंडीतअण्णा संचालक होते.