नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षण स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचयातीच्या खुल्या झालेल्या जागांवर आज मतदान होत आहे. बीड जिल्ह्यात पाच नगरपंचायतीमध्ये निवडणूकांमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
केज नगरपंचायत निवडणुकीत रजनी पाटील यांची प्रतिष्ठा पणाला
केज नगरपंचायत ही काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांच्या ताब्यात मागच्या दहा वर्षापासून आहे. पुन्हा एकदा पाटील कुटुंबियांनी ही नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी मोठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. विशेष म्हणजे केज नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेससमोर राष्ट्रवादीचे मोठे आव्हान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी काँग्रेससमोर केसमध्ये तगडे आव्हान उभे केले आहे
अशी आहे लढत?
- काँग्रेस - 17 जागेवर लढत आहे
- राष्ट्रवादी काँग्रेस - 17 जागेवर लढत आहे
- जनविकास आघाडी - 17 जागेवर लढत आहे
- शिवसेना - 13 जागेवर लढत आहे
आष्टी नगरपंचायत पुन्हा ताब्यात घेण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी कंबर कसली
आष्टी नगरपंचायत मध्ये आमदार सुरेश धस गटाची सत्ता आहे. मात्र मागच्या त्या वेळेस निवडणूक झाली होती. त्या वेळेस सुरेश धस हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार मागच्या टर्ममध्ये निवडून आले होते. यावेळी भाजप विरुद्ध महाविकासआघाडी असा संघर्ष आष्टी नगरपंचायत मध्ये पाहायला मिळणार आहे
अशी होणार लढत
- भाजप - एकूण 17 जगावर निवडणूक लढत आहे ( यात भाजपचे 14 उमेदवार आणि तीन उमेदवार हे पुरस्कृत आहे )
- महाविकास आघाडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस सतरा जागेवर लढत आहे
पाटोदा नगरपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी पुन्हा सुरेश धस गट सक्रिय झाला
पाटोदा नगरपंचायत भाजपचे विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या ताब्यात आहे. पुन्हा ते नगरपंचायत ताबा ठेवण्यासाठी सुरेश धस यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. पाटोदा नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रित निवडणूक लढवत आहेत. त्यांचा सामना भाजपसोबत होणार आहेत तर शिवसेना 17 पैकी चार जागेवर या ठिकाणी निवडणूक लढवत आहे
अशी असेल लढत
- भाजपा 17 पैकी 14 जागेवर निवडणूक लढत आहे. तर तीन जागेवर भाजप पुरस्कृत उमेदवार उभे आहेत
- राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येत 17 जागेवर निवडणूक लढवत आहेत
- शिवसेना चार जागेवर निवडणूक लढवत आहे.
शिरूर नगरपंचायत निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष.. राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांची प्रतिष्ठा पणाला
शिरूर नगरपंचायत ही आमदार सुरेश धस यांच्या ताब्यात आहे. मात्र या नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची मोठी प्रतिष्ठा पणाला लागली होती. खर तर महबूब शेख आणि सुरेश धस हे एकत्रितपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत होते. मात्र सुरेश धस यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला मात्र मेहबुब शेख यांनी राष्ट्रवादीची बाजू शिरूरमध्ये लावून धरली आता या नगरपंचायत निवडणुकीमध्ये लोक कोणाच्या बाजूनं उभे राहतील हे मतमोजणीनंतर कळणार आहे.
अशी होणार लढत
- भाजपा एकूण 17 जागेवर निवडणूक लढत आहे
- राष्ट्रवादी एकूण 17 जागेवर निवडणूक लढत आहे
- काँग्रेस चार जागेवरती निवडणूक लढत आहे
- शिवसेना एकूण 12 जागेवरती निवडणूक लढत आहे
वडवणी नगरपंचायत निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी चा संघर्ष
वडवणी नगरपंचायत ही भाजपाच्या ताब्यात आहे राजाभाऊ मुंडे कुटुंबीयांनी हे नगरपंचायत पुन्हा भाजप च्या ताब्यात ठेवण्यासाठी मोठी प्रतिष्ठा पणाला लावली होती हे विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे माजलगाव चे आमदार प्रकाश सोळुंके यांनी भाजपसमोर या निवडणुकीत कडवे आव्हान उभे केले होते त्यामुळे वडवणी नगरपंचायत निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पहायला मिळाला
अशी होणार लढत
- भाजप एकूण 17 जागेवर निवडणूक लढत आहे.
- राष्ट्रवादी कॉंग्रेस चौदा जागेवर निवडणूक लढत आहे. तर तीन जागांवर राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार उभे आहेत
- शिवसेना पाच जागेवर निवडणूक लढत आहे
- काँग्रेस चार जागेवर निवडणूक लढत आहे.