चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्यात रेल्वेने दिलेल्या धडकेत ३५ बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राजुरा तालुक्यातील विरुर रेल्वे स्टेशन परिसरात आज (सोमवार) दुपारच्या दरम्यान ही घटना झाली. या धडकेत १७ बकऱ्या जखमी झाल्या आहेत.


आज दुपारच्या दरम्यान बकऱ्यांचा कळप रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना ही दुर्घटना झाली. बल्लारपूरकडून चेन्नईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रेनने या कळपाला धडक दिली. ज्यात 35 बकऱ्यांचा मृत्यू झाला.

रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला जाळी लावण्यात असल्यामुळे बकऱ्यांना पळूनही जाता आले नाही. त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.