बीड : बीड जिल्ह्यातील परळीत रेल्वे रुळावर सिमेंटचा ब्लॉक ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मालेवाडीहून परळीला येणाऱ्या मालगाडीला मोठा अपघात टळला.
परळी रेल्वे स्टेशनपासून सात किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. या मार्गावर परळी-हैद्राबाद रेल्वे येण्याआधी एक मालगाडी परळीकडे आली. त्या मालगाडीने हा सिमेंट ब्लॉक किमान शंभर फूट ओढत नेला.
या मालगाडीमुळे रेल्वे ट्रॅकच्या चाव्याही निखळून पडल्या. मात्र सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही. याच मार्गावरुन 15 ते 20 मिनिटं आधी बंगळुरु-नांदेड ट्रेन धावली होती.
रेल्वेरुळावर सिमेंटचा ब्लॉक ठेवण्यामागे घातपात करण्याचा उद्देश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा सिमेंट ब्लॉक उचलण्यासाठी किमान पाच ते सहा जण लागतात. त्यामुळे अनर्थ घडवण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा दाट संशय आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
परळीत रेल्वेरुळावर सिमेंट ब्लॉक, घातपाताचा संशय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jan 2018 09:00 AM (IST)
परळी-हैद्राबाद रेल्वे येण्याआधी एक मालगाडी परळीकडे आली. त्या मालगाडीने हा सिमेंट ब्लॉक किमान शंभर फूट ओढत नेला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -