परीक्षेत कॉपी करण्यासाठी कॉलेजचे सीसीटीव्ही फोडले
एबीपी माझा वेब टीम | 11 Feb 2018 08:53 AM (IST)
कॉलेजच्या मैदानातील, व्हरांड्यातील आणि हॉल मधील तीन सीसीटीव्ही रात्री फोडून टाकले.
बीड : परीक्षेत कॉपी करण्याच्या निरनिराळ्या आयडिया काही विद्यार्थी वापरताना दिसतात. सध्या तर टेक्नॉलॉजीच्या मदतीने विद्यार्थी कॉपी करताना दिसतात. मात्र कॉपी करता यावी म्हणून विद्यार्थ्याने चक्क सीसीटीव्ही फोडल्याचा प्रकार बीडमध्ये पाहायला मिळाला. येत्या 21 तारखेपासून बारावीची परीक्षा सुरु होणार आहे. परीक्षेत कॉपी करायला सीसीटीव्ही अडथळा ठरले असते, म्हणूनच हे सीसीटीव्ही फोडले गेल्याचा संशय महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला आहे. कॉलेजच्या मैदानातील, व्हरांड्यातील आणि हॉलि मधील तीन सीसीटीव्ही रात्री फोडून टाकले. बीडमधल्या मिलिया महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. आरोपी ओळख अद्याप पटलेली नाही. सीसीटीव्ही फोडल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदवण्यात आली आहे.