चंद्रकांत पाटील म्हणाले की, "एक दिवसासाठी भाजपचे नेते व्हा, कशी कसरत करावी लागते ते समजेल. शिवसेना, भाजप, आरपीआय, जानकर, खोत, शेट्टी या सगळ्याचा समतोल करत कसं पुढे जायचं हे लक्षात येईल. पण यशस्वीपणे समतोल साधत आम्ही चार वर्ष पूर्ण केली. एक वर्षही पूर्ण होईल. पुन्हा निवडणूक जिंकू, पुन्हा शिवसेना, भाजप, आरपीआय, जानकर सदाभाऊ खोत, परत आले तर शेट्टीसाहेब सगळे एकत्र येऊ."
युतीबाबत साशंक नाही
"सलग चार वर्षांमधील युतीबाबतच्या माझ्या पत्रकार परिषदा पाहिल्या तर कधीही एका वाक्याने सुद्धा युतीबाबत साशंक नाही. मी नेहमीच म्हणतो युती होईल. हे चार वेळा वेगवेगळ्या घटनांमध्ये पाहिलं आहे. त्यापैकी एक म्हणजे राज्यसभेच्या उपसभपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने मतदान केलं होतं," असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.