जळगावः विरोधकांनी माझ्यावर पुरावे नसताना बेछुट आरोप केले आणि त्याची शिक्षा मी भोगतोय, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर तोंडसुख घेतलं आहे. मात्र, पक्षांतर्गत वादावर बोलणं यावेळी त्यांनी सोइस्करपणे टाळलं.
जळगावातील जिल्हा बँक सभागृहात झालेल्या ग्रामसेवकांच्या राज्यस्तरीय मेळाव्यात खडसे आणि भाजपाचे जलसंधारण मंत्री गिरीश महाजन दोघेही एकाच व्यासपीठावर होते. यावेळी खडसेंनी जोरदार टोलेबाजी केली.
ज्यांनी माझ्यावर गंभीर आरोप केलेत त्यांनी एखादा तरी पुरावा दाखवावा, नाही तर तोंड काळं करावं, असं आवाहन खडसेंनी केलं आहे. पुरावा नसाताना देखील शिक्षा होते, याचं उदाहरण मी अनुभवतोय असं खडसे यांनी म्हटलं आहे.