बारामती (पुणे) : मराठा क्रांती मोर्चा आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीत धडकणार आहे. सकाळी 11 वाजता कसबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन या मोर्चाला सुरुवात होईल.
कोपर्डीतील निर्भया आणि उरीमधल्या शहीद जवानांना मोर्चात श्रद्धांजली वाहिली जाईल. कोपर्डीत प्रकरणातल्या दोषींना फाशी द्या, मराठ्यांना आरक्षण द्या, आणि अॅट्रोसिटी कायद्यात सुधारणा करा, या मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत..
पुण्यातल्या मोर्चाप्रमाणेच बारामतीतील मराठा मोर्चाही विक्रमी ठरण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील सदस्य या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे.
मोर्चा शिस्तबद्ध व्हावा यासाठी 2500 स्वयंसेवक तैनात करण्यात आले असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे.