पुणे: बारामतीत सध्या जय्यत तयारी सुरू आहे ती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या स्वागताची. बारामती नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या लोकार्पण सोहळ्याचं आज आयोजन करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य राहणे, वसिम जाफर, अमोल मुजुमदार, अजित आगरकर हे क्रिकेटवीर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
यावेळी मुंबई आणि महाराष्ट्र संघांमध्ये ट्वेन्टी ट्वेन्टीचा सामनाही खेळवण्यात येईल. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमपेक्षाही हे स्टेडियम मोठे असून, भविष्यात या मैदानावर आंतराष्ट्रीय दर्जाचे सामने खेळवण्यात येतील, असं नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी सांगितलं आहे.