बारामती येथील एमआयडीसी कटफळ मार्गावर मालवाहतूक वाहनांची ब्रेक टेस्ट सुरु होती. इंदापूरमधला दुधाचा टेम्पो ब्रेकच्या चाचणीसाठी आला होता.
वाहन चाळीसच्या स्पीडवर असताना ब्रेक दाबल्यास गाडी जागच्या जागी थांबते की नाही, याची तपासणी केली जाणार होती. मात्र ब्रेक दाबताच टेम्पोचं केबिनच खाली आलं.
चासीज नंबर घेतल्यानंतर ही केबिन लॉक करावी लागते. पण ती व्यवस्थित लॉक न केल्यामुळे असे अपघात होत असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.
हा अपघात होत असताना तरकसे यांनी ब्रेकवरचा पाय न काढल्यामुळे पुढील मोठी दुर्घटना टळली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहन तपासणारे सहाय्यक मोटर निरीक्षक अभिजीत तरकसे किरकोळ जखमी झाले आहेत.