औरंगाबाद : आडगावामध्ये सेंट्रल बँकेचे कर्मचारी आणि लिलावत जमीन खरेदी करणाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.


थकीत कर्जाप्रकरणी आडगावातील शेतकऱ्याच्या 8 एकर जमिनीचा लिलाव झाला. त्यानंतर या जमिनीचा ताबा घेण्यासाठी सेंट्रल बँकेचे कर्मचारी आणि शेतकरी हेमंत पवार गेले. त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांना मारहाण केली.

यावेळी जमिनीचा ताबा घेण्यासाठी आलेल्या बँक अधिकारी आणि शेतकऱ्याच्या गाड्यांच्या हवाही सोडल्या गेल्या. याप्रकरणी सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्यांकडून नारायण हाके, चंद्रकला हाके यांच्यासह 25-30 गावकऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे.