अमरावतीत बँक मॅनेजरला सरपंचाची मारहाण
एबीपी माझा वेब टीम | 24 Jul 2018 05:30 PM (IST)
पार्किंग संदर्भात बँकेला अनेकवेळा निवेदन देण्यात आलं. मात्र बँक व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप अंकुश इंगळे यांनी केला.
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील बेलजचे सरपंच अंकुश इंगळे यांनी इलाहाबाद बँकेच्या व्यवस्थापकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. बँकेसमोर होत असलेल्या पार्किंगमुळे अंकुश इंगळे यांनी ही मारहाण केली. पार्किंग संदर्भात बँकेला अनेकवेळा निवेदन देण्यात आलं. मात्र बँक व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप अंकुश इंगळे यांनी केला. आज सकाळी बँक व्यवस्थापकाला बँकेबाहेर बोलावण्यात आलं आणि नंतर त्यांना मारहाण करण्यात आली. यावेळी इंगळेंसोबत मनसेचे काही कार्यकर्ते देखील होते. बातमीचा व्हिडीओ :