Bank Holiday in April 2021 : पुढील महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये देशभरात बँका 15 दिवस बंद राहतील. महाराष्ट्रात पुढील महिन्यात बँका 10 दिवस बंद राहतील.  त्यामुळे पुढील महिन्यात महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करायचे असतील तर बँका कधी सुरु आहेत आणि कधी बंद आहेत, हे माहिती असणे गरजेचं आहे. तुमची सर्व महत्त्वपूर्ण कामे वेळेत करुन घेण्यासही मदत होईल. येत्या 2021-22 (एप्रिल ते मार्च) आर्थिक वर्षाच्या सुरूवातीस 1 एप्रिल रोजी बँका बंद राहणार आहेत.  एप्रिलमध्ये आणि बँका कधी व का बंद केल्या जातील ते जाणून घेऊया.


बँका एप्रिल महिन्यात कधी आणि का बंद राहणार?


2 एप्रिल - गुड फ्रायडे असल्याने बँका बंद राहतील. (महाराष्ट्र)
4 एप्रिल - रविवार असल्याने बँका बंद राहतील. (महाराष्ट्र)
5 एप्रिल - आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये बाबू जगजीवन राम जयंतीनिमित्त बँकाना सुट्टी असेल. 
6 एप्रिल - तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांमुळं बँका बंद असतील. 
10 एप्रिल - महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँका बंद असतील. (महाराष्ट्र) 
11 एप्रिल - रविवार असल्याने बँका बंद असतील. (महाराष्ट्र)
13 एप्रिल - गुढी पाडवानिमित्त बँकांना सुट्टी असेल. (महाराष्ट्र) 
14 एप्रिल - बाबासाहेब आंबेडकर जयंतीची बँकांना सुट्टी असेल. (महाराष्ट्र) 
15 एप्रिल - हिमाचल दिन, बंगाली नवीन वर्ष, बोहाग बिहू आणि सरहुल निमित्त संबंधित राज्यांमध्ये बँका बंद राहतील. 
16 एप्रिल - बोहाग बिहूनिमित्त बँका बंद राहतील. 
18 एप्रिल - रविवार असल्याने बँका बंद असतील. (महाराष्ट्र)
21 एप्रिल- रामनवमी निमित्त बँकांना सुट्टी असेल. (महाराष्ट्र)
24 एप्रिल - चौथा शनिवार असल्याने बँकाना सुट्टी असेल. (महाराष्ट्र)
25 एप्रिल - रविवार असल्याने बँकाना सुट्टी असेल. (महाराष्ट्र)


New income tax rules | 1 एप्रिलपासून नवे आयकर नियम लागू, जाणून घ्या काय आहेत नवे नियम? 


मे महिन्यातील सुट्ट्या


मे महिन्यातली अनेक सणांमुळे बँका बंद राहतील. मे मध्ये पाच रविवारी असतील म्हणून बँका बंद राहतील. तसेच 13 मे रोजी ईद-उल-फितर आणि 26 मे रोजी बुद्ध पूर्णिमा आहे. त्या दिवशीही बँका बंद राहतील