बीड : मी शेतकऱ्यांसाठीच व्हिडीओ तयार केला होता, पण बँकेने मात्र आपल्यावर एक कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा केला आहे. माझ्याकडे पैसे नाहीत तरी मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती योगेश शेळके यांनी दुसऱ्या व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे. अन्यथा मंत्रालयात आत्महत्या करण्याशिवाय मला पर्याय नाही, असं सुद्धा या व्हिडीओमध्ये योगेश शेळके यांनी म्हटले आहे.
मला कुणाची बदनामी करायची नव्हती, तर केवळ सत्य लोकांना सांगायचं होतं, असं योगेश यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे.
विमा कंपन्या आणि बँक शेतकऱ्यांना कसे लुटतात याचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या योगेश शेळके यांनी बँकेची बदनामी केली म्हणून एक कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करण्यात आला आहे. याबाबत योगेश शेळके यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
बँक आणि विमा कंपनीचा भांडाफोड करणाऱ्या तरुणाविरोधात मानहानीचा दावा
विमा कंपन्या आणि बँका एकत्र मिळून शेतकऱ्यांना कसे लुटतात याचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या योगेश शेळके याने बँकेची बदनामी केली असल्याचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे म्हणणे आहे. त्यामुळे बँकेने योगेश शेळकेवर एक कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. त्यासंबधी बँकेने योगेश शेळकेला नोटीस पाठवली आहे.
दरम्यान, "मी शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ तयार केला होता. परंतु बँकेने मात्र आपल्यावर एक कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. माझ्याकडे इतके पैसे नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणात लक्ष घालावे," अशी विनवणी योगेशने दुसऱ्या एका व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे. "मंत्रालयात आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय नाही," असे योगेश व्हिडीओमध्ये म्हणत आहे.
बजाज अलायन्झ या विमा कंपनीत काम करणाऱ्या योगेशने महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि बजाज अलायन्झवर गंभीर आरोप केले होते. महाराष्ट्र ग्रामीण बँकेत कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यांवर बजाज अलायन्झ या खासगी कंपनीचा विमा (इन्शोरन्स) घेण्यासाठी दबाव आणला जात आहे, असे त्याने म्हटले होते.
... अन्यथा मंत्रालयात आत्महत्येशिवाय पर्याय नाही, 'त्या' तरुणाचा दुसरा व्हिडीओ व्हायरल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Feb 2019 02:10 PM (IST)
मी शेतकऱ्यांसाठीच व्हिडीओ तयार केला होता, पण बँकेने मात्र आपल्यावर एक कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा केला आहे. माझ्याकडे पैसे नाहीत तरी मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती योगेश शेळके यांनी दुसऱ्या व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -