Bandatatya Karadkar : वाईनच्या निर्णयावरुन महिला नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बंडातात्या कराडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बंडातात्या कराडकर यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पोलीस त्यांच्या मठावर दाखल झालेत. फलटणच्या पिंपरद इथल्या बंडातात्या यांच्या मठावर पोलीस दाखल झाले आहेत. बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेण्यात आले असून अटक होण्याची दाट शक्यता आहे. 


आज सकाळी बंडातात्या यांच्या फलटण येथील मठावर पोलीस दाखल झाले. पोलिसांनी बंडातात्यांसोबत चर्चा केली. दारु आणि महिला नेत्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पोलीस बंडातात्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांना पिंपरद  येथून फलटण येथे नेले आहे. 


बंडातात्या कराडकर यांचा माफिनामा 


नेत्यांच्या मुलांबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी बंडातात्या यांनी माफी मागितली. बंडातात्या गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येते होती. गुन्हा दाखल झाला नाही तर न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आला होता. बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली होती. त्याशिवाय बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात बेकायदेशीर आंदोलनप्रकरणी सातारा शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


काय म्हणाले होते बंडातात्या कराडकर?


साताऱ्यात बंडातात्या कराडकर  यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्ती संघटनेचे 'दंडवत आणि दंडूका' आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यातील सर्वच नेत्यांची मुले ही दारु पितात असे सांगताना बंडातात्या कराडकर यांनी आरोप केला होता. या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha