Bandatatya Karadkar Issue LIVE : बंडातात्या कराडकरांच्या अडचणी वाढल्या; जागोजागी निदर्शनं, पाहा प्रत्येक अपडेट्स

Bandatatya Karadkar : राज्य सरकारनं (Maharashtra Govt) वाईनच्या निर्णयावरुन महिला नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बंडातात्या कराडकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पाहा प्रत्येक अपडेट्स.

abp majha web team Last Updated: 04 Feb 2022 11:38 AM

पार्श्वभूमी

Bandatatya Karadkar : राज्य सरकारनं (Maharashtra Govt) वाईनच्या निर्णयावरुन महिला नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बंडातात्या कराडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बंडातात्या कराडकर यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पोलीस त्यांच्या मठावर दाखल झालेत....More

बंडातात्या कराड यांचे विरुद्ध पुणे  न्यायालयात पहिला खटला दाखल

पुणे महापालिकेच्या मा. नगरसेविका ऍड. रुपाली पाटील ठोंबरे यांनी बंडातात्या कराड यांनी दिनांक ०3.०2.2022 रोजी राजकीय महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याचे विरुद्ध पुणे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब यांचे न्यायालयात खटला दाखल केलेला आहे.  सदर प्रकरणात न्यायालयाने सदर प्रकाराची दखल घेऊन आरोपींवर कडक शासन करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. प्रस्तुत प्रकरणात फिर्यादी तर्फे ऍड विजयसिंह ठोंबरे, ऍड हितेश सोनार, ॲड दिग्विजयसिंह ठोंबरे व विष्णू होगे काम पाहत आहे.