मुंबई : राज्यात सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांची पुस्तकं, गणवेश त्यासोबतच शालेय साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून बालभारतीने तातडीने शालेय विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वाटप केली आहे. ही पुस्तकं 2 महापालिका आणि 5 जिल्हापरिषदांमध्ये वाटप करण्यात आली आहे.
आतापर्यंत कोल्हापूर, सांगली , सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या ठिकाणी पुरस्थितीमुळे नुकसान झाले आहे. अशा ठिकाणी 1,54,917 पुस्तके वाटप करण्यात आली असून यामध्ये सांगली महानगरपालिकेला 34,628 पुस्तकं, कोल्हापूर महानगरपालिकेला 10,293 पुस्तकं, पळूस तालुक्यासाठी 19208 पुस्तकं, वाळवा तालुक्यात 35,574 पुस्तकं, मिरज तालुक्यात 33995 पुस्तकं तर शिरोळ तालुक्यात 16,695 पुस्तकं वाटप करण्यात आली आहे.
याशिवाय, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेला सुद्धा 4,5171 पुस्तकं विद्यार्थ्यांसाठी वाटप करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांना या भागात गणवेश सक्ती करण्यात येऊ नये, असे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
14 ऑगस्टला राज्याच्या शिक्षण विभागाकडून पूरस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त भागात झालेल्या शालेय साहित्यच्या नुकसानीनंतर परिपत्रक काढून बालभारतीला मोफत पुस्तके या शालेय विद्यार्थ्यांना देण्यात यावे, असे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. शिवाय, या भागातील विद्यार्थ्यांना हव्या त्या पोशाखात शाळेत प्रवेश द्यावा असं सुद्धा शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेची विस्कटलेली घडी पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी तात्काळ मदत करण्यात येत आहे. त्यामुळे 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान ही पुस्तके या पूरग्रस्त भागात पाठविण्यात आली असून गरज पडल्यास आणखी पुस्तकाचा पुरवठा बालभारतीकडून करण्यात येणार आहे.
बालभारतीकडून पूरग्रस्त भागात तातडीने दीड लाखांहून अधिक पुस्तकं वाटप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Aug 2019 10:52 PM (IST)
या भागातील विद्यार्थ्यांना हव्या त्या पोशाखात शाळेत प्रवेश द्यावा असं सुद्धा शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेची विस्कटलेली घडी पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी तात्काळ मदत करण्यात येत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -