मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या थोर व्यक्तींच्या यादीत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आहे. पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा थोर व्यक्तींच्या यादीत सामावेश करण्यात आल आहे. सरकारने जारी केलेल्या या यादीत एकूण 41 थोर व्यक्तींचा समावेश आहे.
2021 मध्ये राष्ट्र पुरुष/थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत राज्य सरकारने 15 डिसेंबर 2020 रोजी परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकात राष्ट्र पुरुष, थोर व्यक्ती यांचे जयंती किंवा राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम सोबत जोडलेल्या परिशिष्टानुसार मंत्रालयात, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यायलायत साजरे करण्यात येणार आहेत. या थोर व्यक्तींच्या यादीत बाळासाहेब ठाकरे यांचंही नाव आहे. महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लक्ष लागलं आहे.
सरकारने जारी केलेले जयंती आणि राष्ट्रीय दिन कार्यक्रमांची यादी
- सावित्रईबाई फुले जयंती- 3 जानेवारी
- जिजाऊ माँ साहेब जयंती- 12 जानेवारी
- स्वामी विवेकानंद जयंती- 12 जानेवारी
- नेताजी सुभाषचांद्र बोस जयंती- 23 जानेवारी
- बाळासाहेब ठाकरे जयंती- 23 जानेवारी
- संत सेवालाल महाराज जयंती -15 फेब्रुवारी
- बाळशास्त्री जांभेकर- 16 फेब्रुवारी
- छत्रपती शिवाजी महाराज जयंती- 19 फेब्रुवारी
- सांत गाडगेबाबा महाराज जयंती- 23 फेब्रुवारी
- संत रविदास महाराज जयंती- 27 फेब्रुवारी
- यशवंतराव चव्हाण जयंती- 12 मार्च
- शहीद दिन- 23 मार्च
- महात्मा ज्योतिबा फुले जयंती- 11 एप्रिल
- डॉ. बाबासाहेब आांबेडकर जयंती- 14 एप्रिल
- राष्ट्रसांत तुकडोजी महाराज जयंती, 30 एप्रिल
- महात्मा बसवेश्वर जयंती- 14 मे
- दहशतवाद वाद व हिंसाचार विरोधी दिवस- 21 मे
- स्वातांत्र्यवीर सावरकर जयंती- 28 मे
- आहिल्याबाई होळकर जयंती, 31 मे
- महाराणा प्रतापसिंह जयंती- 13 जून
- राजर्षी शाहू महाराज जयंती, 26 जून
- वसंतराव नाईक जयंती, 1 जुलै
- लोकमान्य बाळ गांगाधर दिळक जयंती- 23 जुलै
- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती- 1 ऑगस्ट
- क्रांतिसिंह नाना पाटील जयंती- 3 ऑगस्ट
- सद्भावना दिवस- 20 ऑगस्ट
- राजे उमाजी नाईक जयंती- 7 सप्टेंबर
- केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे- 17 सप्टेंबर
- पंडित दिनियाळ उपाध्याय जयंती- अंत्योदय दिवस- 25 सप्टेंबर
- महात्मा गाांधी जयंती- 2 ऑक्टोबर
- लाल बहाद्दूर शास्री जयंती- 2 ऑक्टोबर
- डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम जयंती- 15 ऑक्टोबर
- महर्षी वाल्मिकी जयंती- 20 ऑक्टोबर
- इांदिरा गाांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस- 31 ऑक्टोबर
- वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस- 31 ऑक्टोबर
- पंडित नेहरु जयंती- 14 नोव्हेंबर
- बिरसा मुंडा जयंती- 15 नोव्हेंबर
- इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन- 19 नोव्हेंबर
- संविधान दिवस- 26 नोव्हेंबर
- संत संताजी जगनाडे महाराज जयंती- 8 दिसेंबर
- डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख- 27 डिसेंबर