बाळासाहेब ठाकरे यांचा सोपल यांच्यावरचा ‘तो’ व्हीडिओ व्हायरल
एबीपी माझा वेब टीम | 28 Aug 2019 10:26 PM (IST)
ज्यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी खरमरी टीका केली अशा आमदाराला पक्षप्रवेश दिला जात असल्याने सर्वचं क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त होतं आहे.
सोलापूर : सचिन आहिर, चित्रा वाघ, शिवेंद्रराजेंनंतर आता राष्ट्रवादीचे बार्शीचे राष्ट्रवादीचे मावळे मानले जाणाऱ्या आमदार दिलीप सोपल यांनी देखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. आज त्यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते हाती शिवबंधन बांधून घेतलं. या प्रवेशानंतर सोपलांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलीप सोपल यांचा चांगलाचं समाचार घेतला आहे. या भाषणात सोपल यांचा माकड असा उल्लेख केला आहे. उस्मानाबाद लोकसभा प्रचारा दरम्यानचा हा जुना व्हिडीओ आहे. VIDEO VIRAL | बाळासाहेब ठाकरे यांचा सोपल यांच्यावरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल | ABP Majha बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते? "सोपल या माकडाला तुम्ही एवढी किंमत देता? तुम्ही मर्द बसलात तर कोण सोपल, आडवा झालाय तिकडं हॉस्पिटलमध्ये. अन्नाची शपथ घेऊन नमक हरामी केलीय त्याने. तुम्ही सगळे फाडणारे मर्द इकडे असताना मी कशाला त्याच्याशी बोलयचं?. धूळ चारा आता त्याला बार्शीची धूळ. त्याला सांगा तू जरी बेईमान असला तरी बार्शीची धूळ इमानदार आहे. इथे गद्दाराना गाडून टाकू आम्ही." ज्यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी खरमरी टीका केली अशा आमदाराला पक्षप्रवेश दिला जात असल्याने सर्वचं क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त होतं आहे. दिलीप सोपल यांची राजकीय कारकीर्द वर्ष पक्ष निकाल 1985 समाजवादी काँग्रेस विजयी 1990 काँग्रेस विजयी 1995 अपक्ष विजयी 1999 राष्ट्रवादी काँग्रेस विजयी 2004 राष्ट्रवादी काँग्रेस पराभव 2009 अपक्ष विजयी 2014 राष्ट्रवादी काँग्रेस विजयी