अकोला जिल्ह्यातील तुरीच्या थकीत चुकाऱ्याचे 20 कोटी रुपये उद्याच मिळणार आहेत. तर अमरावती विभागातील थकीत 74 कोटी 10 जुलैपर्यंत मिळतील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
तूर खरेदी सुरु करणे आणि दोन महिन्याचा थकीत चुकारा देण्याच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन केलं. यावेळी त्यांनी अकोला जिल्हा मार्केटिंग अधिकारी बजरंग ढाकरेंना कार्यालयात तीन तास कोंडलं.