Bachchu Kadu Meets Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावरून भाजपसह महायुती सरकारवर घणाघाती प्रहार केल्यानंतर आज (6 ऑगस्ट) प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी शिवतीर्थवर राज ठाकरे यांची भेट घेतली. बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांना मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या यात्रेला येण्याचे साकडं घालत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचं आवाहन केलं. शेतकरी म्हणून राज ठाकरे यांचा अभ्यास आहे. शेतकरी म्हणून शेतकरी एकत्र येत नाहीत ही राज ठाकरे यांची खंत असल्याचं ते म्हणाले. दररोज दहा ते पंधरा लोक आत्महत्या करतात हे युद्धापेक्षा मोठं असल्याचे त्यांनी सांगितले. बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून हल्लाबोल केला. ते म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोग म्हणत आहे की व्हीव्हीपॅटचा वापर करणार नाही. मग त्यापेक्षा भाजप कार्यालयामध्येच शिक्के मारा, असा हल्लाबोलही बच्चू कडू यांनी केला. 

मराठवाड्यातील यात्रेसाठी राज ठाकरे यांनी यावं

बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. बच्चू कडू म्हणाले की, सरकार कर्जमाफीवरून ज्या पद्धतीने टिंगल करत आहे ते चुकीचं आहे. ते म्हणाले की दुष्काळ पडण्याची वाट पाहिली जाते हे चुकीचं असन शेतमालाला भाव भेटत नसल्याने शेतकरी मरत आहे हे दुष्काळापेक्षा भयंकर असल्याचे बच्चू कडू म्हणाले. त्यामुळे मराठवाड्यातील यात्रेसाठी राज ठाकरे यांनी यावं यासाठी त्यांना विनंती केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, मुंबई यापूर्वी अनेक वेळा आम्ही बंद होताना पाहिली. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मुंबईने पाठीशी उभा रहावं. यासाठी एक दोन तास मुंबई  बंद राहिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 

मनसे सोबत आली तर आम्हाला नक्कीच बळ मिळेल 

बच्चू कडू यांना युती संदर्भात विचारण्यात करण्यात आली असता म्हणाले की मनसे सोबत आली तर आम्हाला नक्कीच बळ मिळेल. राजकीय युतीवरती बोलताना बच्चू कडू यांनी सांगितले की, जात, धर्म, पक्ष विरोधी आंदोलन आहे. राज ठाकरे यांच्याशी राजकीय युती करण्याचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या