Ravi Rana on Bacchu Kadu : बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) जे सोंग केलं ते फक्त राजकीय फायद्यासाठी केलं आहे असे म्हणत रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली. राजकारणात जिवंत राहिलं पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) बैठक झाली आहे, बोलणं सुद्धा झालं आहे, लवकरच बच्चू कडू शिंदे गटात दिसतील आणि पुनवर्सन होईल असेही रवी राणा म्हणाले. 

Continues below advertisement


 सरकार सुरुवातीपासून शेतकऱ्यांसोबत आहे. सरकारने शेतकऱ्यांना 32 हजार कोटी रुपये दिले आहेत. कर्जमाफी होणारच असल्याचे मत आमदार रवी राणा यांनी व्यक्त केले. सरकार सक्षमपणे लाडकी बहीण योजना चालवत असल्याचेही ते म्हणाले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा आहे, पण आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजे असे राणा म्हणाले. 


30 जूनपर्यंत कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार, मुख्यमंत्र्यांची माहिती


30 जूनपर्यंत कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. आम्ही जी उच्चस्तरीय कमिटी स्थापन केली आहे, ती समिती 1 पर्यंत एप्रिल आम्हाला अहवाल देईल. त्यानंतर 30 जूनपर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचं आश्वासनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. 


आमच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीबाबत घोषणा केली होती. त्यासंदर्भात आम्ही मागच्या काळात एक समिती स्थापन केली होती. उपाययोजना कशा करायच्या याचा निर्णय केला होता. कर्जमाफी हा एक भाग आहे. शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकत आहे. पण त्यांना बाहेर कसं काढता येईल याचा आम्ही विचार करत आहोत. यादृष्टीने आम्ही मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी (Praveen Pardeshi) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परदेशींच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती कर्जमाफीसंदर्भात कशा पद्धथीने करता येईल, निकष काय असतील, भविष्यात शेतकरी कर्जाच्या विळख्यातून बाहेर कसे येतील त्यासंदर्भात अभ्यास करणार आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या समितीने आपलं कामकाज पूर्ण करावे.