रेल्वे टॉयलेटमधून पडूनही बचावलेल्या बाळाचा आईसह मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 27 Apr 2017 05:27 PM (IST)
रायगड/मुंबई : रत्नागिरी-दादर ट्रेनच्या टॉयलेटमधून पडूनही बचावलेल्या नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. बाळासोबतच त्याच्या आईचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी रत्नागिरीहून दादरला येणाऱ्या धावत्या ट्रेनमधील टॉयलेटमध्ये महिलेची प्रसुती झाली होती. त्यावेळी हे बाळ ट्रेनच्या टॉयलेटमधून खाली पडूनही सुखरुप होतं. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी नवी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये या बाळाचा, तर मंगळवारी रात्री बाळाच्या आईचा लिव्हर डॅमेजमुळे मृत्यू झाला.