Baba Siddiqui murder case : माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique Murder Case) यांच्या हत्या प्रकरणातील महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी सलीम शेख उर्फ सलीम पिस्टल याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिस स्पेशल सेल आणि भारतीय सुरक्षा एजन्सी यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. सलीम पिस्टल हा भारतातील सर्वात मोठा हत्यार तस्कर करणारा म्हणून ओळखला जातो.
अवैधरित्या भारतात हत्यारांची तस्करी, पाकिस्तान, ISIS आणि डी गॅगशीही संबध
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून सलीम हा पाकिस्तानमधून अवैधरित्या भारतात हत्यारांची तस्करी करत असून त्याचे पाकिस्तान, ISIS आणि डी गॅगशीही संबध असल्याचे अनेक पुरावे तपास यंत्रणेच्या हाती लागले आहेत. तपासात लॉरेन्स बिष्णोई आणि हाशिम बाबा सारख्या कुख्यात गुंडटोळींना देखील सलीम हत्यारे पुरवत होता. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील एका आरोपीचा सलीम हा गुरु असल्याचेही तपासात समोर आले आहे. यापूर्वी 2018 मध्ये दिल्ली पोलिसांनी सलीमला अटक केली होती. त्यानंतर सलीम परदेशात पळून गेला होता.
12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती
माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique Murder Case) यांची 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे नेते त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांच्या कार्यालयाजवळ उपस्थित असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्याच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे. विरोधकांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली होती. राष्ट्रवादीचे नेते आणि त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ उपस्थित असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रात मोठा वावर असणाऱ्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनं महाराष्ट्र हादरून गेला होता. बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे बिश्नोई गँग असल्याचं बोललं जात होतं. लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने य हत्येची जबाबादारी घेतली होती. लॉरेन्स बिश्नोई आणि त्याची टोळी अनेक राज्यांमध्ये पसरली असून त्यांच्याकडे 700 हून अधिक शूटर्स असल्याचं एनआयएच्या आरोपपत्रात उघड झालं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं 1990 च्या दशकात आपल्या टोळीचा विस्तार केला होता. त्याच पद्धतीनं बिश्नोई आणि त्याची टोळी पुढे जात असल्याचा दावा एनआयएनं केला आहे.
महत्वाच्या बातम्या: