उपोषणाला बसलेल्या शिक्षकाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 10 Jun 2016 06:14 AM (IST)
औरंगाबाद : गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. जाफराबादचे गजानन खरात या 36 वर्षीय शिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावं, या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण सुरु होतं. मात्र आज गजानन खरात यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना घरी नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने, त्यांचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यातील वरखडा इथे राहणारे गजानन खरात हे, जालन्यातीलच जाफराबाद येथील समर्थ विद्यालयात कार्यरत होते. या दुर्दैवी निधनामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.