Urangabad News Update : "मी काल केलेल्या वक्तव्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतली आहे. मला जास्त वेळ मिळाला नाही पण त्यांनी माहिती घेतली आहे. माध्यमांना ज्यांनी माहिती दिली तोच नेता माझ्याविरोधात कट रचत आहे, तो तुम्हाला माहित आहे. तो कोण आहे त्याची माहिती मुख्यमंत्री घेणार आहेत. मी कोणाचं नाव घेतले नाही, आमच्याकडे काही घटना घडल्या त्या 5 मिनिटात पोचतात. त्यामुळे मला शंका आहे. माझ्याच पक्षातील नेत्याचा माझ्याविरोधात कट आहे, असा आरोप अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केला होता. यावर आज पत्रकार परिषदेत त्यांनी हा नेता कोण हे हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे असे म्हट ले आहे.
राज्यातील टीईटी घोटाळा, सिल्लोड महोत्सवासाठी अधिकाऱ्यांना दिलेले टार्गेट, गायरान जमिनीचे प्रकरण यावरून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी चांगलेच घेरले होते. मोठा गदारोळ झाल्यानंतर याबाबत अधिवेशनात कृषिमंत्री सत्तार यांनी आपली बाजू मांडली होती. या सर्व आरोपानंतर बोलताना त्यांनी माझ्याच पक्षातील नेत्याचा माझ्याविरोधात कट आहे, असा आरोप केला होता.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्याचा रोख नक्की कोणाकडे आहे याबाबत अद्याप समजलेले नाही. परंतु, सिल्लोड महोत्सवासाठी शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाट आले का नाही असे विचारताच त्यांनी हे काही आमदार खासदारांचं संमेलन नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी सिल्लोडला येणार आहेत. काही नेते सोडले तर माझ्यावर कोणी नाराज नाही, असे सत्तार यांनी म्हटले आहे. .
Abdul Sattar : काय म्हणाले होते अब्दूल सत्तार?
अब्दुल सत्तार यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहे. माझ्याच पक्षातील नेत्यांचा माझ्याविरोधात कट असल्याचा आरोप सत्तार यांनी केलाय. "ज्याला मंत्रिपद मिळाले नाही, असा माझ्याच पक्षातील एक नेता माझ्याविरोधात सध्या कट करत आहे. या प्रकाराबाबत आपण लवकरच मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत. माझ्यावर झालेल्या सर्व आरोपांचे खुलासे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले आहेत. मी राज्यमंत्री नसतानाही त्या काळातील आरोपही माझ्यावर आता करण्यात आले आहेत. असे आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्यावर आरोप का केले जात आहेत? राष्ट्रवादीची माझ्यावर का चीड आहे, याचे कारण मला माहीत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरात होणारी चर्चा बाहेर येत आहे. आमच्यातील कोणीतरी बाहेर या बातम्या पुरवत आहे, असा आरोप सत्तार यांनी काल म्हणजे शनिवारी केला होता.
महत्वाच्या बातम्या
Exclusive: माझ्याच पक्षातील नेत्यांचा माझ्याविरोधात कट; अब्दुल सत्तारांचा मोठा गौप्यस्फोट