Aurangabad BJP Protest : सरकाराला मुंबईबाहेर राज्य आहे हे माहिती नाही : देवेंद्र फडणवीस
Aurangabad BJP Protest : औरंगाबादमधल्या पाणीटंचाईवरुन आक्रमक भूमिका घेत भाजप आज रस्त्यावर उतरली आहे. या जल आक्रोश मोर्चाची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर....
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 23 May 2022 07:48 PM

पार्श्वभूमी
औरंगाबाद : औरंगाबादमधल्या पाणीटंचाईवरुन आक्रमक भूमिका घेत भाजप आज रस्त्यावर उतरली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पैठणगेट ते औरंगाबाद महापालिका कार्यालयापर्यंत जल आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या मोर्चात केंद्रीय मंत्री...More
औरंगाबाद : औरंगाबादमधल्या पाणीटंचाईवरुन आक्रमक भूमिका घेत भाजप आज रस्त्यावर उतरली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पैठणगेट ते औरंगाबाद महापालिका कार्यालयापर्यंत जल आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या मोर्चात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि डॉ. भागवत कराड यांच्यासह प्रमुख नेते सहभागी झाले आहेत. या मोर्चाची तयारी सुरु आहे. या मोर्चासाठी जवळपास तीन हजार हंडे आणि आठ हजार झेंड्याची ऑर्डर देण्यात आली होती आणि आता हे साहित्य आता औरंगाबाद भाजप कार्यालयात पोहोचलंय. औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या मुद्यावरून भाजपकडून 'जल आक्रोश मोर्चा' काढण्यात येत असून मोर्चाला प्रत्यक्षात सुरवात झाली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळत आहे. शहरातील पैठणगेट येथून या मोर्च्याला सुरवात झाली आहे. यावेळी भाजपचे आमदार,माजी नगरसेवक आणि महत्वाच्या नेत्यांची उपस्थिती सुद्धा पाहायला मिळत आहे. पैठण गेट येथून निघणारा मोर्चा औरंगाबाद महानगरपालिकेच्या कार्यालयावर धडकणार आहे. तर या मोर्च्यात तीन हजार महिला हंडे घेऊन सहभागी झाल्या आहेत. तर एवढी वर्षे महानगरपालिकेत सत्ता असताना शिवसेना पाणी प्रश्न मिटवू शकली नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.तर मोर्चा आता महानगरपालिकेच्या कार्यालयाकडे निघाला आहे. मोर्चामध्ये भाजप महिला कार्यकर्त्यांनी पाण्यासाठी जोगावा मागून निषेध नोंदवला आहे. औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी मात्र पाणीटंचाई कृत्रिम नसून शहरात कमी प्रमाणात पाणी येतं त्यामुळे पाणी टंचाई असल्याचं म्हटलं शिवाय शहरवासीयांवर बंधने देखील घातली आहे . यापुढे महानगरपालिकेचे पाणी बांधकाम व्यवसायिक बांधकामाकरता वापरू शकत नाही गाडी धुणे, रस्ते धुणे यासाठी देखील पाणी वापरण्यास मनाई केली आहे.
Devendra Fadnavis : सरकाराला मुंबईबाहेर राज्य आहे हे माहिती नाही : देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहे की नाही? असा प्रश्न पडत आहे. औरंगाबाद मराठवाड्याच्या राजधानीच शहर आहे हे त्यांना माहितच नाही वाटते. या सरकाराला मुंबईबाहेर राज्य आहे हे माहिती नाही, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.