25 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात वडिलांना अटक, मुलाची आत्महत्या
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 09 Jun 2016 08:57 AM (IST)
औंरगाबाद : 25 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात वडिलांना अटक केल्याने 16 वर्षीय मुलाने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. औरंगाबादमध्ये बुधवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. अमोल नाडे असं मृत मुलाचं नाव आहे. अमोलचे वडील हरिश्चंद्र नाडे यांच्यावर 25 वर्षांपूर्वी हाणामारीचे दोन गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली. मात्र वडिलांना अटक करु नका, अशी विनंती अमोल नाडे वारंवार करत होता. मुलाच्या विनवणीला न जुमानता पोलिसांनी हरिश्चंद्र नाडेंना अटक केली. वडिलांना अटक झाल्याच्या धक्क्याने 16 वर्षांच्या अमोलने विहरीत उडी मारुन आत्महत्या केली. दरम्यान, वाळूज पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.