औरंगाबाद: औरंगाबादमध्ये कॉलेज सोडून एका घरात पेपर लिहिणाऱ्या 27 विद्यार्थ्यांवर औरंगाबाद क्राईम ब्रान्चने धाड कशी मारली, त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

काल शिवसेनेचे नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरात औरंगाबादमधली 27 मुलं सिव्हिल इंजिनियरिंगचे पेपर सोडवत असल्याची टिप पोलिसांना मिळाली. त्यांच्यावर धाड टाकून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. ही सगळी कारवाई कशी झाली, हे या व्हिडिओत कळतंय.

या प्रकरणी 27 विद्यार्थी, शिवसेना नगरसेवक सीताराम सुरें, महाविद्यालयाच्या प्राचार्यंसह अन्य 4 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिवाय याप्रकरणी आज बामू विद्यापीठाचे कुलगुरू, परिक्षा नियंत्रक आणि कुलसचिव यांची बैठक होणार आहे. या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.