Aurangabad Coronavirus Restrictions  : कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता औरंगाबादेत प्रशासनाने नियम, निर्बंध अधिक कडक केले आहेत. या नियमांचे पालन करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. पालन न केल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद प्रशासनाने निर्बंध लावले आहेत. 


काय आहेत नवे नियम - 
1) कोविड टेस्ट positive आल्यावर रुग्णाला गृह विलगीकरणात  (Home isolation) राहायचे असेल तर घरातील सर्व सदस्यांचे लसीकरण (दोन्ही डोस) पूर्ण असणे बंधनकारक.
2) घरातील इतर सदस्यांनी Home Quartine राहणे बंधनकारक (इतर सदस्यांनी बाहेर फिरू नये)
3) गर्दीवर नियंत्रण ठेवा. हॉटेलमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. सभा/ कार्यक्रमहॉटेल/ रिसॉर्ट मधील गर्दीचे चित्रीकरण करा
4) हुरडापार्टीवर पूर्णपणे निर्बंध/ हुरडापार्टी सुरू असल्यास पोलीस कार्यवाही करणार.(पोलीस अधीक्षक/ पोलीस आयुक्त) 
5) शहराबाहेरील फार्म हाऊस/ रिसॉर्टवर बंदी. सुरू दिसल्यास पोलीस कार्यवाही होणार (पोलीस अधीक्षक)
6) मंगल कार्यालयाने आगामी लग्नाच्या booking ची माहिती प्रशासनाला कळवावी. 50 पेक्षा जास्त गर्दी होणार नाही याचे मंगल कार्यालयाने Under taking द्यावे लागणार. नियमांचे उल्लंघन केल्यास  पोलीस कार्यवाही होणार. (पोलीस आयुक्त/पोलीस  अधीक्षक)
7) मास्क घातले नाहीत म्हणून कारवाई पोटी आजपर्यंत 1875 वाहन चालकांचे license रद्द केले यापुढे ही कार्यवाही सुरू राहणार. कार्यवाही झाल्यास वाहन विक्री करता येणार नाही (संजय मैत्रेवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी)
8) लसीकरण आणि मास्क शिवाय पेट्रोल नाही
9) सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या रजा रद्द
10) शहर आणि ग्रामीण भागातील लग्नामध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भेटी द्या. 


ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
राज्यातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर जाताना पाहायला मिळत असताना, राज्य आणि स्थानिक पातळीवर कठोर निर्णय घेऊन तिसऱ्या लाटेला येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्हा परिषदच्या आरोग्य विभाग आणि महसूल विवध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.


24 तासांत औरंगाबादमध्ये 85 रुग्ण -
आरोग्य मंत्रालायाने दिलेल्या आकडेवारीनुसार, औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात गेल्या 24 तासांत 85 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर औरंगाबादमध्ये दोन ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत.