औरंगाबाद : औरंगाबादच्या शरदचंद्र पवार पॉलिटेक्निकमध्ये कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. धक्कादायक गोष्ट म्हणजे कॉपी पुरवताना पालकही उपस्थित होते. या परीक्षेसाठी व्हॉट्सअॅपचाही वापर केला जात होता.
या प्रकरणी पाच पालक आणि विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. काही विद्यार्थ्यांकडून मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. औरंगाबादच्या ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.
औरंगाबाद-बीड रस्त्यावरील निपाणी भालगाव भागात शरदचंद्र पवार कॉलेज आहे. त्यात पॉलिटेक्निकच्या तिसऱ्या आणि फार्मसीच्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा सुरु होती. त्यावेळी भरारी पथकानं कारवाई केलेल्या कारवाईत कॉपीबहाद्दर विद्यार्थी पकडण्यात आलं.
व्हॉट्सअॅपवरुन विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर पेपर पाठवत होते. त्यानंतर चिठ्ठीत उत्तर लिहून आतमध्ये पाठवलं जायचं.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
औरंगाबादेत शरदचंद्र पवार कॉलेजमध्ये व्हॉट्सअॅपवरुन कॉपी
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
20 Nov 2017 02:53 PM (IST)
कॉपी प्रकरणी पाच पालक आणि विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -