औरंगाबाद : औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांचेच बूट चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. नवल किशोर राम यांचे बूट आंबेडकर संशोधन केंद्रातून गहाळ झाले.


औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे स्मार्ट सिर्टी योजनेच्या बैठकीनिमित्त आंबेडकर संशोधन केंद्रात गेले होते. एका हॉलबाहेर त्यांनी स्वतःच्या पायातील बूट काढून ठेवले. बैठक संपल्यानंतर नवल किशोर राम हॉलबाहेर आले, तेव्हा बूट जागेवर नव्हते.

जिल्हाधिकाऱ्यांनी बराच वेळ बूटाची शोधाशोध केली, त्यांच्या सहकाऱ्यांनीही इकडे-तिकडे पाहिलं, पण बूट काही सापडले नाहीत. अखेर गाडीत अनवाणी बसून घरी जाणंच त्यांनी पसंत केलं.

नवल किशोर राम यांची पादत्राणं कोणी जाणूनबुजून चोरली, की घाई-गडबडीत कोणी त्यांचे बूट घालून गेलं, हे समजायला मार्ग नाही. मात्र या किस्सा दिवसभर अनेकांना चघळण्यासाठी पुरेसा ठरला.