औरंगाबादः राष्ट्रवादी नेते मधुकर पिचड यांना औरंगाबाद खंडपीठाने दणका दिला आहे. पिचड यांचं महादेव कोळी जातीचं वैधता प्रमाणपत्र औरंगाबाद खंडपीठानं रद्द केलं आहे. त्यामुळे आता पिचडांना केवळ कोळी महादेव जातीचं प्रमाणपत्र आणि त्यानुसार मिळणारे फायदे देण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत.


पिचडांच्या जात प्रमाणपत्रामुळे आदिवासी समाजाचं नुकसान झाल्याची याचिका नागपूरच्या महाराष्ट्र आदिवासी मन्ना जमात मंडळाने दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

पिचड कोळी महादेव जातीचे असताना त्यांनी महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र सादर केलं होतं. त्यामुळे हा वाद निर्माण झाला. त्यामुळे आता मधुकर पिचडांना एसटी मध्ये आरक्षण घेता येणार नाही.