अमरावती : अमरावती मध्यवर्ती बँकेच्या 700 कोटींच्या गुंतवणूकप्रकरणी 3 कोटी 39 लाखांच्या दलालीबाबत 5 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि माजी जिल्हा बँक अध्यक्ष बबलू देशमुख यांना 15-15 लाख रुपये दिले असल्याचे या क्लिपमध्ये म्हटले आहे. सोबतच जिल्हा बँकेचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही मोठ्या किमतीच्या भेटवस्तू दिल्याचे म्हटले आहे. यामुळे जिल्हा बँक निवडणुकीत खळबळ उडाली आहे. 


5 ऑडिओ क्लिप असून यामध्ये लाखो रुपयांची दलाली खाल्ल्याचे म्हटले आहे. यामध्ये दलाल, वीरेंद्र जगताप आणि बबलू देशमुख यांचे संभाषण असल्याचे म्हटले आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये संचालकांनाही महाग गिफ्ट दिले का? अशी विचारणा केली आहे. यांच्या माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या पत्नी उत्तरा जगताप या बँकेच्या तत्कालीन अध्यक्ष आहे. त्यांना 20 सप्टेंबरला ईडी कार्यालयात हजर राहायचे आहे तर बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांना 23 सप्टेंबरला बोलवण्यात आले आहे. पण या ऑडिओ क्लिपमुळे मात्र काँग्रेस चांगलीच अडचणीत सापडली आहे.


या ऑडिओ क्लिप बद्दल आम्ही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांच्याशी बोलण्याचं प्रयत्न केला असता त्यांनी सांगितलं की, ही ऑडीओ क्लिप पूर्ण बोगस आहे. तोड मरोड करून बनविली आहे. पण बबलू देशमुख यांनी कॅमेरासमोर बोलण्यास तूर्तास नकार दिला आहे. मी नंतर बोलेल असं त्यांनी एबीपी माझाकडे प्रतिक्रीया दिली आहे.



रेकॉडींगच्या पहिल्या क्लिप मधलं संभाषण...
निप्पोन कर्मचारी : सर उसमे मेरे पास अभी भी 70 लाख का बॅलेन्स हे. आप बताईये क्या करना हे.
जगताप : हमको तेरे से कुछ लेना नही
निप्पोन कर्मचारी : क्योंकी 30 लाख रुपये मैने सर आपको पेड किया हे
जगताप : 1 रुपया तेरे से लेना नही.. जो दिया..
निप्पोन कर्मचारी : वो तो होंगा ही नही सर.. जेएन रिपोर्ट आगई..
जगताप : नही होणे देना, हमको क्या करना हे.. हम तेरे को बता देंगे.. में भी कितना दिमाख वाला हू.. तू शार्प समजता हें ना खुदको. बहोत होशियार समजता हेना. हम तेरेको बता देंगे की विरेंद्र जगताप क्या चीज हे.. अरे दस-पंधरा लाख मे हमको तू क्या गधा समज रहा क्या.. तू पंधरा ओर बिस करोड कमायेंगा ओर हमको..क्या चुतीया समझा हे क्या..
निप्पोन कर्मचारी : नही सर पंधरा बिस करोड तो नही आएंगे. आप को ब्रोकर को भी पुछ लेंगे तो कोईभी आपसे.. नही ना सर.. पंधरा बिस किसको बोलते हें.. सर..
जगताप : तेरे से एक रुपया लेना नही. तू सो करोड कमा पर हम को कोई लेना देना नही.. तेरा व्यवहार हमसे खतम हो गया..



रेकॉडींगच्या पाचव्या क्लिप मधलं संभाषण...
रजत : सर नमस्कार, रजत बोल रहा हू.. निप्पोन से..
देशमुख : हा.. हा.. रजतभाई बोलीये..
रजत : कैसे हे सर..
देशमुख : बढीया.. बढीया..
रजत : अच्छा सर कल आपको वो लेटर मिल गये होंगे, जो-जो आपणे मेरे को फोन किया था. वो मेल पें हमने वो भिजवा दिए थे. मिल गए ना आपको..
देशमुख : नही, अभी देखता हू में..
रजत : अच्छा सर, आज भी वो देडसो करोड का कुछ रेडमशन हे. एक बार अगर आप बात करके रोक सके तो रुकवा दिजीए न सर..
देशमुख : नही, मैने आपको बोला था की ये होणे के बाद, दुसरे दिन ही मे फटाफट करवा देता सब आपको..
रजत : अच्छा सर, अब वो मनी वाला इश्यू सॉर्टआऊट होंगा, उसके बादही आप आगे बढ पाएंगे..
देशमुख : हा.. हा.. हा.. पुरा इश्यू सॉर्टआउट होंगा, तो ही अभी तक  आये नही ना वो.
रजत : ठीक हे सर..ठीक हे..


नेमकं हे प्रकरण काय आहे?
अमरावती जिल्हा बँकेने एका खासगी कंपनीत 700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यात दलाली पोटी 3.39 कोटी रुपये देण्यात आले. ही गुंतवणूक थेट बँकेकडून झाली असताना दलाली देणे बंधनकारक नव्हते, त्यामुळे बँकेची 3.39 कोटींनी फसवणूक झाली अशी तक्रार बँकेचे प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी 15 जून 2021 रोजी अमरावती शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि सहा दलाल अशा एकूण 11 जणांवर फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात आता ईडीने बँकेचे माजी अध्यक्ष बबलू उर्फ अनिरुद्ध देशमुख आणि उत्तरा जगताप यांना समन्स बजावले आणि विना विलंब ईडी कार्यालयात हजर राहण्याच सांगितले तर पुढील महिन्यात जिल्हा बँकेची निवडणूक होत आहे. यात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे, त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ईडीच्या एन्ट्रीने खळबळ उडाली. आणि आता ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली.. ही जिल्हा बँक तब्बल 11 वर्ष काँग्रेसच्या ताब्यात आहे.