रोह्यात कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळली !
एबीपी माझा वेब टीम | 05 Mar 2017 07:58 PM (IST)
रोहा (रायगड) : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामध्ये कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळली. या दुर्घटनेत 25 ते 30 प्रेक्षक जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली. रोहा येथील क्रीडा संकुलात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी लाकडी गॅलरी बनवण्यात आली होती. हीच गॅलरी कोसळून ही दुर्घटना घडली. जखमींना डॉ ध्रुव, डॉ अशोक जाधव, डॉ वैरागी तसेच रोहा उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना अलिबाग, माणगाव तसेच मुंबईला हलविण्यात आले आहे. दरम्यान, जखमींना उपचारानंतर सोडण्यात आलं आहे. तर 3-4 जखमींवर अद्याप उपचार सुरु आहेत.