परभणीः मराठवाड्यात परत एका तरुणाला आयसिसशी संबंध असल्याच्या कारणावरुन अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अटक करताना एटीएसने या तरुणाकडून तब्बल एक किलो स्फोटकं जप्त करण्यात आले आहेत.
परभणीतून शाहीद खान नावाच्या तरुणाला 1 किलो स्फोटकांसह अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसनं टाकलेल्या छाप्यामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी परभणीतून नासेरबिन या तरुणाचं आयसिस कनेक्शन उघड करत एटीएसने कारवाई केली होती.
मराठवाड्यातील मुस्लीम तरुणांवर आयसिसची वक्रदृष्टी असल्याचं परभणीतूनच पुन्हा एकदा उघड झालं आहे. एटीएसच्या या कारवाईची पुढील दिशा शाहीद खान याला औरंगाबाद येथे आणल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र परभणीतूनच पुन्हा एक कारवाई करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.