पणजी/गोवा : धाडस दाखवून एटीएम लुटीचा डाव उधळणाऱ्या सुरक्षारक्षकाचा गोव्यात सुरक्षारक्षकाचा डीजीपींकडून आज सत्कार करण्यात आला.
गोव्यात शनिवारी बँक ऑफ महाराष्ट्राचं एटीएम लुटण्याचा प्रयत्न झाला. एक व्यक्ती हातोडी घेऊन एटीएममध्ये शिरल्यानं आधी सुरक्षारक्षक रानू सिंगला त्याच्यावर संशय आला.
जेव्हा आत जाऊन रानू सिंगनं पाहिलं, त्यावेळी तो व्यक्ती एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी रानू सिंगनं न भीता त्याला रोखलं. यात चोरट्याने रानू सिंगच्या डोक्यात हातोडीने वार केले. यात तो जखमीही झाला.
मात्र सुरक्षारक्षक आपल्याला बधणार नाही, हे लक्षात आल्यावर एटीएम लुटणाऱ्यानं अखेर पळ काढला. ही संपूर्ण घटना एटीएम सेंटरमधील सीसीटीव्हीत कैद झाली असून, सुरक्षारक्षकाच्या या धाडसाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
या घटनेची दखल घेऊन गोवा पोलिसांच्या वतीने सुरक्षा रक्षक रानू सिंगचा सत्कार करण्यात आला. गोव्याचे पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांच्या हस्ते रानू सिंगचा सत्कार करण्यात आला.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एटीएम लुटीचा डाव उधळून लावणाऱ्या धाडसी सुरक्षारक्षकाचा सत्कार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Oct 2017 10:18 PM (IST)
धाडस दाखवून एटीएम लुटीचा डाव उधळणाऱ्या सुरक्षारक्षकाचा गोव्यात सुरक्षारक्षकाचा डीजीपींकडून आज सत्कार करण्यात आला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -