Pune Weather Update : गेल्या दोन दिवसांपासून (Weather Pune) पुणे शहरातील किमान तापमानात घसरण सुरु झाली आहे. सोमवारी तापमान 8.6 अंश सेल्सिअस नोंदवल्यानंतर मंगळवारी (10 जानेवारी) तापमान आणखी 7.4 अंश सेल्सिअसने घसरलं आहे. 2017 नंतर (Pune) पहिल्यांदाच पुणेकरांनी (Tempreture) जानेवारीतील सगळ्यात थंड दिवस अनुभवला. पुण्यातील तापमान महाबळेश्वरपेक्षा (14.2 अंश सेल्सिअस) कमी होते. राज्यात सर्वात कमी 5.3 अंश सेल्सिअस जळगाव येथे होते. मध्य महाराष्ट्रात, जळगावपाठोपाठ पुणे (7.4  अंश सेल्सिअस) तर नाशिकमध्ये 7.6अंश सेल्सिअस होते.


महाराष्ट्रात बुधवारपासून (11 जानेवारी) किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. बुधवारी तापमान 8 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज असून गुरुवारपासून किमान तापमान 14 जानेवारीपर्यंत वाढेल. 15 जानेवारीपासून किमान तापमानात आणखी एक-दोन दिवस घट होण्याची अपेक्षा आहे. मंगळवारी पुण्यात या हिवाळ्याच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. भारतीय हवामान विभाग (IMD), पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले.


आयएमडीने नुसार, पुण्यात 2017 पासून मंगळवारचा जानेवारीचा सर्वात थंड दिवस होता. हंगामातील दुसरे सर्वात कमी तापमान 9 जानेवारी रोजी 8.7 अंश सेल्सिअस होते आणि तिसरे सर्वात कमी तापमान 30 ऑक्टोबर 2022 रोजी  (12.6 अंश सेल्सिअस) होते. 


वातावरणातील बदलाचा आरोग्यावर परिणाम


मागील दोन आठवड्यापासून पुण्यातील (Pune) वातावरणात बदल होत आहेत. रात्री (Weather) तापानात घट आणि दिवसा उन्हाचे चटके जाणवत आहेत. या वातावरणाच्या बदलामुळे पुणेकरांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास होत आहे. मागील काही दिवसांपासून डॉक्टरांकडे संसर्गाच्या अनेक तक्रारी आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. दोन महिन्यांपासून पुण्यातील वातावरणात चढउतार सुरु आहेत. दर आठवड्यात तापमानात कधी घट तर कधी वाढ होत आहे. यामुळे अनेकांच्या आरोग्यावर देखील परिणाम दिसून लागले आहे. मागील आठवड्यापासून हवामानात आणि पुण्यातील हवेत बदल झाले आहेत. पुण्यातील हवाही प्रदूषित झाली आहे. या दोन्ही कारणामुळे निम्मे पुणे आजारी असल्याचं समोर आलं आहे. 


राज्यभरात थंडीची लाट


पुण्यातच नाही तर राज्यभरात थंडीची लाट आली आहे. सोमवार आणि मंगळवार दोन दिवस तापमानात घट झाली आहे. राज्यातील नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. नंदुरबार जिल्ह्यात या वर्षातील सर्वात कमी म्हणजेच 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या वाढत्या थंडीचा रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.