नांदेड : ‘अंगणवाडी सेविकांचा प्रश्न जसा महत्वाचा आहे, तसाच एसटी कर्मचार्यांचा प्रश्न देखील महत्वाचा आहे. मात्र उद्धव ठाकरे हे दुटप्पी भूमिका घेत आहेत.’ अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
‘परिवहन खातं हे शिवसेनेकडे आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांबाबत उद्धव ठाकरे यांची दुटप्पी भूमिका चालणार नाही.’ असंही यावेळी अशोक चव्हाण म्हणाले. ते काल (गुरुवार) नांदेडमध्ये बोलत होते.
मागील 3 वर्षांपासून एसटी तोट्यात आहे आणि हे सरकारचं उत्तरदायित्व आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत. तर या संपामुळे दुसरीकडे सामान्य लोकांचे हाल होत आहेत. त्यामुळे सरकारनं तात्काळ यावर तोडगा काढावा. अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सलग चौथा दिवस आहे. एसटी प्रशासन आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही तोडगा न निघाल्यामुळे सामान्यांचे मोठे हाल होत आहेत. दिवाळीच्या चौथ्या दिवशीही प्रवाशांचा खोळंबा सुरुच आहे.
एसटी कर्मचाऱ्यांबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका दुटप्पी : अशोक चव्हाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Oct 2017 07:52 AM (IST)
‘अंगणवाडी सेविकांचा प्रश्न जसा महत्वाचा आहे, तसाच एसटी कर्मचार्यांचा प्रश्न देखील महत्वाचा आहे. मात्र उद्धव ठाकरे हे दुटप्पी भूमिका घेत आहेत.’
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -