Ashok Chavan: बदलापूर घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीने दिली आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद करण्यापेक्षा राज्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याची गरज आहे, असं भाजप नेते खासदार अशोक चव्हाण म्हणालेत. बदलापूर असो किंवा देशातील कोणत्याही अशा घटनांना राजकीय पक्षाचा समर्थन नाहीये. त्यामुळे जनजीवन विस्कळीत करण्यापेक्षा सकारात्मक सूचना कराव्यात, अशा घटना घडू नये यासाठी काय करण्याची गरज आहे याबाबत सूचना कराव्या असं चव्हाण म्हणालेत. नांदेडमध्ये ते बोलत होते.


मागील काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचारांच्या घटनेतील वाढ झाल्यानंतर बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने देश हादरला आहे. या घटनेच्या विरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून येत्या 24 तारखेला त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्र बंद करून जनजीवन विस्कळीत करण्यापेक्षा सकारात्मक सूचना करा, असा सल्ला महाविकास आघाडीला भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी दिला. 


काय म्हणाले अशोक चव्हाण? 


महाविकास आघाडीने बंद करण्यापेक्षा राज्यात अशा घटना होऊ नये यासाठी सकारात्मक भूमिका घ्यायची गरज आहे असा सल्ला भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी दिला. ते म्हणाले, बदलापूर असो किंवा देशातील कोणतेही असे घटना असो कोणत्याच राजकीय पक्षाचं त्याला समर्थन नाही. त्यामुळे जनजीवन विस्कळीत करण्यापेक्षा सकारात्मक सूचना कराव्यात. अशा घटना घडू नये यासाठी काय करण्याची गरज आहे याबाबत सूचना कराव्या. बदलापूर घटनेमध्ये लक्ष देऊन पोलिसांनी आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे. त्यावर कारवाई ही सुरू आहे. राज्य सरकार आपल्या परिणय सर्व प्रयत्न करत आहे. राजकीय पक्षांनी या घटनेचा राजकारण न करता सकारात्मक सूचना मांडल्या पाहिजेत. कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे हीच भूमिका सर्वांची आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले. 


महाराष्ट्र पोलिसांनी प्रकरणात लक्ष घातलंय 


बदलापूर प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घातलं आहे. जवळपास 66 लोकांना या प्रकरणात अटक करण्यात आली असून कारवाई सुरू आहे. सरकार आपला परिणाम सर्व काही करत आहे. ही घटना निषेधार्य नक्कीच आहे. याचे राजकारण न करता आपल्या सूचना मांडल्या पाहिजेत. असंही खासदार अशोक चव्हाण म्हणाले.


महाराष्ट्र मनाने अस्वस्थ असून पेटलेला आहे


मुंबईत काल महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना खासदार संजय राऊत, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, भाई जगताप, खासदार वर्षा गायकवाड आणि नसीम खान यांची उपस्थिती होती. या बैठकीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. "आजच्या बैठकीत आम्ही कोणतीही राजकीय चर्चा केली नाही. कारण, महाराष्ट्र मनाने अस्वस्थ असून पेटलेला आहे. त्यामुळे आम्ही फक्त कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा केली. सरकारने तातडीने महिला अत्याचाराच्या घटना रोखाव्यात", असं संजय राऊत म्हणाले.