नवी दिल्लीः राष्ट्रवादी तडजोड करण्यास तयार नसेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वतंत्र लढण्यासाठी काँग्रेसचा मार्ग मोकळा आहे, असं स्पष्टीकरण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलं आहे.

अशोक चव्हाण यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांसह दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतली. बैठकीला विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, प्रभारी मोहन प्रकाश बैठकीला उपस्थित होते.

बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. मागील बैठकीतील जागा वाटप मागणीवर काँग्रेस ठाम आहे. राष्ट्रवादी तडजोड करण्यास तयार नसेल तर काँग्रेसची स्वबळाची तयारी आहे, असं स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिलं.