Maharashtra News : भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. संजय राऊतांचा (Sanjay Raut) बाबरी मशिदीसोबत मुख्यमंत्री आणि राऊत यांचा काय संबंध आहे असा सवाल उपस्थित करत शिवसेनेच्या नेत्यांना बुद्धी दोष झाला आहे, असं म्हणत शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला आहे. बाबरी मशिदीबाबत वक्तव्य करतानात शेलार यांनी म्हटलं आहे की, जे आता बाबरीबाबत बोलत आहेत, त्यांचा त्यावेळी जन्मसुद्धा झाला नव्हता.


बाबरी मशिद पाडली तेव्हा इतर कुणीही पुढे आलं नाही. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी जबाबदारी घेतली, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. यावर प्रत्युत्तर देत शेलार यांनी म्हटलं आहे की, 'व्हा जबाबदारी राम सेवकांनी घेतली. लढाई संघ, विश्व हिंदू परिषद आणि भाजपनं लढली. आंदोलन सांधूसंतांनी सुरु केलं.' श्रेय लाटण्याच्या नादात गोंधळ करु नका, असंही शेलार म्हणाले आहेत.


भाजप नेते शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद सांगताना सध्या राज्यात चर्चेत असलेल्या हनुमान चालिसेच्या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. हनुमान चालिसा आणि भोंग्याचा विषय भाजपचा नसल्याचं शेलार यांनी सांगितलं आहे. तसेच पेट्रोल-डिझेलच्या मुद्द्यावर भाजपने काम केलं आहे. देशात आणि राज्यात पेट्रोल-डिझेलच्या करावरील सवलत भाजप सरकारनेच दिली. पेट्रोल-डिझेल दरवाढीवर आंदोलन करणाऱ्यांनी सरकारला वॅट कमी करायला सांगावा, असंही शेलार यांनी यावेळी सांगितलं आहे.


काय म्हणाले संजय राऊत?
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला. बाबरीच्या वेळी शिवसेना कुठे होती, हे तुमच्याच पक्षातील नेत्यांना विचारा, असं संजय राऊत म्हणाले आहेत. तर भोंगे हा विषय नाहीये. भोग्यांपेक्षा महत्त्वाचे विषय देशात आहेत. या भोंग्यांना पावर कोणाची आहे, हे देशाला माहित आहे, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवरही टीकास्त्र लादलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या