Arvind Sawant on Sanjay Shirsat Buldhana : हाती सिगारेट आणि शेजारी पैशांची बॅग असलेला मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat)  यांचा व्हिडीओ समोर आला आहे. यानंतर विरोधकांनी शिरसाट यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुळातच खोके नावाने ते कुप्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राला लांचन लावण्याचा काम, रसातळाला नेण्याचे काम यांनी केल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant)  यांनी केली. ते बुलढाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अवघा महाराष्ट्र त्यांना पन्नास खोके एकदम ओके नावाने महाराष्ट्र ओळखतो. पैशाच्या राशीवर बसलेली ही माणसे आहेत. रात्रीस खेळ चाले, तसा यांचा पैशाचा खेळ चालू असतो असे सावंत म्हणाले.

Continues below advertisement

संजय गायकवाड यांच्यावरही सावंत यांची टीका

छत्रपती संभाजीनगरलाही हॉटेलचा व्यवहार झाला होता. भाजपच्या सगळ्या मंत्र्यांना घेऊन ते कारभार करत असतात. महाराष्ट्रातील जनतेने अंतर्मुख व्हावं असे सावंत म्हणाले. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या टीकेला देखील अरविंद सांवत यांनी प्रत्युत्तर दिलं. संजय गायकवाड विरोधक नालायक आहेत असं म्हणाले होते. यावर बोलताना सावंत म्हणाले की, महाराष्ट्राने ठरवायचे आहे नालायक कोण आहे ते. त्यांनी कधी कुठला पश्चातप केला. इथे बऱ्याच जणांच्या जमीन बळकावल्या आहेत. पुतळे बांधायचे आणि त्याच्या मागे दडून लोकांना लुटायचे. ही घाण एकदा संपली असती, आमच्या ताईचा उदय झाला असता तर असे सावंत (Arvind Sawan) म्हणाले. 

संजय गायकवाड यांच्यावर FIR व्हायला पाहिजे 

शिळं अन्न दिल्याच्या कारणावरुन शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवास कँन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. यावर देखील सावंत यांनी प्रतिक्रिया दिली. संजय गायकवाड यांच्यावर FIR व्हायला पाहिजे होता. अदखल म्हणजे काहीच नाही असे गायकवाड म्हणाले. आश्चर्य आहे की विधानसभेचे अध्यक्ष काय करतात.  अधिवेशन सुरू आहे. कस्टोडियन म्हटले जाते त्यांना असे सावंत म्हणाले. आमदार निवास सुद्धा त्यांच्या अंडर येतं. त्यांनी खूप गंभीर घ्यायला पाहिजे होती. आज पंतप्रधाना आरोप करतात की 75 करोड चा जलसिंचन घोटाळा झाला आहे. पण ज्यांनी घोटाळा केला त्यांना सन्मानाने घेतले जाते, मंत्री केले जाते असे सावंत म्हणाले. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Sanjay Gaikwad: आय डोन्ट केअर! चांगल्या कामासाठी कितीही गुन्हे दाखल होऊ दे; संजय गायकवाडांनी ठणकावून सांगितलं