हापूस आंब्याची आवक वाढली, तब्बल 1 लाख पेट्या APMC मार्केटमध्ये दाखल, दरात घसरण

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये (APMC Market) हापूस आंब्यांच्या (Hapus Mango) पेट्यांची बंपर आवक झाली आहे. आज 1 लाख हापूस आंब्यांच्या पेट्या एपीएमसीत दाखल झाल्याने दर कमी झाले आहेत. 8

Continues below advertisement

Navi Mumbai : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये (APMC Market) हापूस आंब्यांच्या (Hapus Mango) पेट्यांची बंपर आवक झाली आहे. आज 1 लाख हापूस आंब्यांच्या पेट्या एपीएमसीत दाखल झाल्याने दर कमी झाले आहेत. 80 हजार हापूस आंब्याच्या पेट्या कोकणातील रायगड , रत्नागिरी , सिंधूदूर्ग जिल्ह्यातून आल्या आहेत. तर उर्वरीत 20 हजार पेट्या परराज्यातून आल्या आहेत. यामध्ये कर्नाटक, केरळ राज्यांचा समावेश आहे. कर्नाटकचा हापूस 60 ते 120 रुपये किलोने विकला जात आहे.

Continues below advertisement

कोकणातील हापूस आंब्याला किती मिळतोय दर?

कोकणातील हापूस आंब्याला 1500 ते 3500 रुपयांचा दर हा चार डझनाच्या पेटीला मिळत आहे. मे महिन्याच्या 10 तारखेपर्यंत हापूस आंब्याचा सिझन चांगला असल्याने खवय्यांनी याच काळात आंबा खरेदी करावे असे आवाहन व्यापारी वर्गाने केले आहे. हापूस आंब्या बरोबर तोतापुरी , बदामी या जातीचे आंबे सुध्दा बाजारात येवू लागले आहेत.

आंबा प्रेमींना आंबा खाण्यासाठी एक पर्वणी

चालू एप्रिल महिन्यापासून हापूस आंब्याचा हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू होतो. सध्या हापूस आंब्याच्या एका पेटीला जवळपास 3 हजार ते 4 हजार रुपयांपर्यंतचा बाजार भाव मिळतोय. मे महिन्यात मोठ्या प्रमाणात हापूस आंबा बाजारात येत असतो. मात्र, यंदा 1 एप्रिल ते 10 मे पर्यंत मोठ्या प्रमाणात हापूस आंबा बाजारात उपलब्ध झाला आहे. त्यामुळं या एप्रिल महिन्यापासून आंबा प्रेमींना आंबा खाण्यासाठी एक पर्वणीच मिळाली आहे. तसंच, कमी दरात आंब्याचा आस्वाद घेता येणार आहे. अशातच मे महिन्यात आंब्याच्या उत्पादनावर परिणाम होणार दर सुद्धा वाढण्याची शक्यता आहे.

कोकणातील हापूस  हा आपल्या वेगळ्या चवीसाठी जगभर प्रसिद्ध

कोकणातील हापूस  हा आपल्या वेगळ्या चवीसाठी जगभर प्रसिद्ध असून त्याला जगभरातून  मोठी मागणी आहे. नैसर्गिक संकटं आणि असंख्य आव्हानं पेलत हापूस आंबा आता सातासमुद्रापार पोहोचलाय. कोकणातील (Konkan) प्रमुख शहारांमध्ये हापूसला योग्य दर मिळाला नसला तरी आखाती देशात हापूस आंब्याला चांगला दर मिळत आहे. फळ बाजारात हापूसची आवक वाढत असून, परदेशातून देखील हापूसची मागणी वाढत आहे. त्यामुळं याचा फायदा कोकणातील आंबा बागायतदारांना होणार आहे. कोकणातील प्रमुख शहारांमध्ये हापूसला पुरेसा दर मिळाला नाही तरी आखाती देशात चांगलाच दर मिळत आहे. कोकणात खास करुन रत्नागिरी, देवगड आणि रायगड जिल्ह्यातील हापूस हा जगप्रसिद्ध आहे. कोकणात अडीच लाख मेट्रीक टन उत्पादनापैकी 25 हजार मेट्रीक टन फळाची तर 10 हजार मेट्रीक टन मॅंगो पल्पची निर्यात होते. त्यामुळं 340 कोटी रुपयांचे परकीय चलन मिळते. 

महत्वाच्या बातम्या:

Alphonso Mango : कोकणाच्या हापूसचा गोडवा सातासमुद्रापार, परदेशातून मागणी वाढली; शेतकऱ्यांना मिळतोय फायदा 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola